डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठान विषयी -
न्यासाची स्थापना -
ग्रामीण भागातील मुलांना सर्व त-हेच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कै . आ. डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू यांनी ग्रामीण भागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था रूजविल्या. दिनांक 25 जुलै 1992 रोजी झालेल्या आ. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या निधनानंतर त्यांच्या अपु-या कार्याचा वारसा चालविण्याच्या हेतूने त्यांच्याच नांवाने प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. कै. तात्यांच्या हिंतचिंतकांनी सन 1992 मध्ये
डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान या न्यासाची स्थापना केल्यानंतर पंचवीस वर्षांच्या कालावधीत त्याचा विस्तार झपाटयाने वाढला आहे. प्रतिष्ठानव्दारे पाच माध्यमिक विद्यालये, दोन ज्युनिअर कॉलेज, एक इंग्रजी माध्यमाची शाळा व एक मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह चालविले जात आहे.
डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानची उद्दीष्टे -
-
शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, विज्ञान, तांत्रिक, पशुसंवर्धन, माध्यमिक उच्चमाध्यमिक इत्यादी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे.
-
विविध प्रकारची वैद्यकिय शिबीरे आयोजित करून गरीब व गरजू लोकांसाठी वैद्यकीय सहाय्य, औषधोपचार अल्प खर्चात उपलब्ध करून देणे. सल्ला देणे, तसेच वैद्यकीय केंद्रे चालविणे.
-
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या आपदग्रस्तांना मदत करणे.
-
ग्रामीण भागाची सुधारणा होण्यासाठी सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे. शेतीविषयक निरनिराळे उद्योग व मार्गदर्शन शिबीरे आयोजित करणे.
-
गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे व आर्थिक मदत करणे.
-
ग्रामीण भागामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना राबविणे, पाणी टंचाईच्या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना व इतर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व त्यासाठी मदत करणे, सहाय्य करणे.
-
ग्रामीण विकासाशी संबंधित ग्रामीण पातळीवर सर्व योजना राबविणे.