top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

तात्यासाहेब नातू प्रतिष्ठान विषयी

संस्था आणि संस्थेच्या इतर उपक्रमांची संक्षेपाने माहिती

 

प्रतिष्ठानव्दारे आयोजिण्यात येणारे  उपक्रम

प्रेमजीभाई आसर विद्यार्थी वसतिगृह -
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया  मागासलेल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा  लाभ होत आहे. हे वसतिगृह चिपळूण-गुहागर रस्त्यावरील रामपूर या गावापासून सुमारे 4 कि. मी. अंतरावरील देवखेरकी या गावी चालविले जाते. सध्या या वसतिगृहामध्ये 43 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शैक्षणिक उपक्रम माध्यमिक विद्यालये 

1) वसंत जयराम भागवत विद्यामंदिर बोरगाव , ता. चिपळूण
2) डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण
3) श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर
4) ग.ज. तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरीआगर, ता. गुहागर
5) दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, ता. गुहागर
6) भागिर्थीबाई सुदाम पाटील कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) अंजनवेल, ता.गुहागर
7) वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव,ता. चिपळूण
8) इंग्लिश मिडीयम स्कूल मार्गताम्हाने, ता. चिपळूण

9) प्रेमजीभाई आसर छात्रालय देवखेरकी, ता. चिपळूण 

10) श्रीधर ग्रंथालय मार्गताम्हाने, ता. चिपळूण      

वरील सर्व  शैक्षणिक उपक्रम अत्यंत ग्रामीण आणि डोंगराळ भागात असून त्या परीसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची  चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रतिष्ठानचे शालेय उपक्रम 

शैक्षणिक उपक्रम - 

 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिकेचे आयोजन, निवासी शिबीरे,गणित व इंग्रजीसाठी मान्यवर प्रशिक्षकांच्या कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत चालवले जातात.

शिक्षक प्रबोधिनी -

श्री. शेखर गाडगीळ यानी शिक्षक प्रबोधिनी करिता रूपये 25 लक्षची भव्य आर्थिक मदत प्रतिष्ठानला दिली सदर देणगीतून शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेसाठी प्रशस्त  हॉलसहित  दुस-या मजल्याचे काम श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर  करण्यात आले. शिक्षक प्रबोधिनी  हॉलमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रतिष्ठान विविध विषयातील मान्यवराना या प्रशिक्षण शिबीरासाठी आमंत्रित करते. गुहागर व शेजारील तालुक्यामधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना या प्रशिक्षणाचा फायदा होतो.

रात्र अभ्यासिका -

गरीब विद्यार्थ्यांच्या घरामध्ये अभ्यासासाठी वेगळी जागा व विज उपलब्ध नसल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत रात्री एका शिक्षकाच्या देखरेखीखाली अभ्यासाची सोय करून दिली जाते.रात्र अभ्यासिका उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन शाळेचा निकाल वाढनेस मदत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता सदर  उपक्रम फक्त संस्थेच्या शाळांमध्ये राबविला जातो.

व्यक्तिमत्व विकास शिबीर -
संस्थेव्दारे चालविण्यात येणा-या शाळांमधील इ. 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान मार्गताम्हाने व क्रिडा भारती महाराष्ट्र प्रांत यांचे संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या कालावधीची दोन व्यक्तिमत्व विकास शिबीरे आयोजित करण्यात आली होती. या शिबीरांमध्ये शारीरिक क्षमता कसोट्या, लेझिम या सहित सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

क्रीडाविषयक उपक्रम -

विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व समजावे तसेच शारिरीक तंदुरूस्तीसाठी विविध क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यात येतात. क्रीडा प्रशिक्षक विद्यार्थ्यांची आवड व योग्यता यांचा विचार करून क्रीडा प्रशिक्षण देतात.तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिष्ठानचे मुले व मुली सहभागी होतात. श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर या विद्यालयाची विद्यार्थींनीचा कब्बडी संघ सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी पात्र ठरला. कुमारी सपना भगवाण म्हादे ही विद्यार्थीनी क्रीडा प्रशिक्षांच्या योग्य मार्गदर्शनामुळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान तिला मिळाला.  डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण या विद्यालयातील कुमारी अंकीता चंद्रकांत कदम ही विद्यार्थीनी राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी पात्र ठरली. 

विद्यार्थी बक्षिस योजना -

प्रतिष्ठानने काही रक्कम बॅंकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतवली आहे. या रक्कमेच्या येणा-या व्याजामधुन शैक्षणिक सहशालेय उपक्रमामध्ये प्राविण्य मिळवना-या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. सदर उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन अधिक प्राविण्य मिळवण्याची प्रेरणा निर्माण होते. 

शिक्षक बक्षिस योजना -

शिक्षकांना प्रोत्साहन देणेसाठी ही बक्षिस योजना राबविली जाते. जे शिक्षक शालेय व सहशालेय उपक्रमाध्ये चांगली कामगिरी नोंदवतात त्याना संस्थेकडुन विशेष बक्षिसे दिली जातात.

गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत योजना -

संस्थेच्या सर्व शाळा ग्रामीण व डोंगराळ भागात आहेत. बहुतांश पालक हे गरीब शेतकरी आहेत. अतिशय गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्था गणवेश व शालेय साहित्य मिळवुन देणेसाठी प्रयत्न करते. सदर उपक्रमासाठी संस्था इतर स्वंयसेवी संस्थाकडे अर्ज करून मदत मिळवण्याचा प्रयत्न करते. 

सर्वोंत्तम विद्यार्थी पुरस्कार -

चतुरंग प्रतिष्ठान मुंबई या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील  आग्रगण्य संस्थेमार्फत सर्वोंत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार दर वर्षी दिला जातो. कोकणातील दर वर्षी सुमारे 50 शाळा हा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांचे शालेय व सहशालेय उपक्रम यांमधील कामगिरी तपासली जाते विद्यार्थ्याला मिळेलेली पदके, प्रमाणपत्रे यांची छाननी केली जाते.  विद्यार्थ्याला या पुरस्कारासाठी निवड होण्यापूर्वी एका तज्ज्ञ समिती  मुलाखत  घेते. 2018 पर्यंत संस्थेच्या पाच शाळांमधील 30 विद्यार्थ्याना हा पुरस्कार मिळाला आहे.  

सूर्यनमस्कार स्पर्धा -

प्रतिष्ठानव्दारे चालविल्या जाणा-या माध्यमिक विद्यालयांमधून मकरसंक्रात ते रथसप्तमी या कालावधीत सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये प्रथम आणि व्दितीय क्रमांक  मिळविणा-या  विद्यार्थ्यांनाᅠ रोख रक्कमेचे पारीतोषिक देण्यात येते.

एक मुल, एक झाड -

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत: लाऊन त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जाते. सदर उपक्रम श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागरदुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, ता. गुहागर येथे सुरू करणेत आले.

जाती प्रमाणपत्र -

दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाकरीता जातीचे प्रणाणपत्र महत्वाचे आहे. जातीचे प्रमाणपत्र तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयातुल मिळवताना विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. यासाठी प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाचण्याकरीता  तालुकास्तरीय व ग्रामपंचयतीतील शासकीय अधिका-याना  शाळेत समोरासमोर बसवुन प्रत्यक्ष जात पडताळणी करून जाती प्रमाणपत्र देण्यात आले. सदर उपक्रम हा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये राबविला जातो.

दिव्यांग विद्यार्थी मदत योजना -

2006-2007 मध्ये राजेश गणपत धनावडे हा विद्यार्थी संस्थेच्या प्रेमजीभाई आसर विद्यार्थी वसतिगृहामध्ये रहायला व डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण शिक्षण घेत होता. सदर विद्यार्थी 50 टक्के दिव्यांग होता. संस्थेने जिल्हा शल्यचिकीत्सक व माध्यमिक शालांत महामंडळाकडे अर्ज करून शालांत परीक्षेमध्ये पेपर सोडविणेसाठी अर्धा तास जास्त वेळ मिळणेसाठी अर्ज करून यशस्वी पाठपुरावा केला. सन 2010-2011 मध्येही वरीलप्रमाणेच विद्यार्थ्याला मदत करणेत आली. 

     

प्रतिष्ठानचे इतर उपक्रम

शेतीविषयक शिबीर -
सन 1995 साली शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरादरम्यान अत्याधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनही आयोजित केले होते. या शिबीराचा शेतक-यांना चांगला लाभ झाला.

भारत लोकसंख्या प्रकल्प - 7
सन 1996-1997 या वर्षात भारत लोकसंख्या प्रकल्प - 7 अंतर्गत छोटे कुटुंब व लोक संख्या नियंत्रण, पाळणा लांबविण्याच्या पध्दती व नसबंदी हा कार्यक्रम एक वर्षाच्या कालावधीसाठी आयोजिला  होता. 

रक्तगट तपासणी शिबीर -
रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करुन गरजू रूग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध होणेच्या दृष्टीने हा  उपक्रम राबविण्यात येतो. 

हेपॅटायटीस बी लसीकरण -
ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यावश्यक असणारा हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2000 ते 22 एप्रिल 2001 या कालावधीत राबविण्यात आला. त्यानंतर पुन्हा 15 डिसेंबर 2002 ते 22 जून 2003 आणि 12 जानेवारी 2003

 ते 20 जुलै 2003 या कालावधीमध्ये अनुक्रमे तळवली, ता. गुहागर, आणि आबलोली  ता. गुहागर या दोन ठिकाणी राबविण्यात आला होता. यासाठी आवश्यक असणारी लस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली होती.

मत्स प्रक्रिया प्रशिक्षण शिबीर -
खाडी किनारी राहणा-या मच्छिमारीचा व्यवसाय करणा-या महिलांसाठी डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान मार्गताम्हाने व कृषी विज्ञान केंद्र शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य प्रक्रिया प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. मत्स्योत्पादनापासून विविध प्रकारच्या टिकाऊ वस्तूंचे उत्पादन सुरू करुन त्यांच्या व्यापारात अग्रेसर होणेच्या दृष्टीने या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

मोफत बालरूग्ण तपासणी -
दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयीच्या सेवा मिळणे अत्यंत त्रासाचे आणि खर्चाचे ठरते याकरीता प्रतिष्ठानव्दारे अशा भागातील बालरूग्णांची विनामूल्य तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना औषधांचाही पुरवठा विनामूल्य करण्यात येतो. 

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी -
प्रतिष्ठानव्दारे पाच माध्यमिक विद्यालये चालविण्यात येतात. या पाचही  शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या व जंताच्या गोळ्यांचे विनामूल्य वाटप केले जाते. 

सौरऊर्जा कार्यशाळा -
अपारंपारीक उर्जेची आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिष्ठानने सौरउर्जा या विषयावर दि. 16 ते 17 डिसेंबर 2005  व 03 जानेवारी 2009 ते 04 जानेवारी 2009 या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी  सौरउर्जेतील श्रेष्ठ संशोधक श्री. निळकंठ  ढेरे - फ्लोरीडा अमेरीका व त्यांच्या दोन सहकारी उपस्थित होत्या.   या कार्यशाळेसाठी चिपळूण- गुहागर तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील होतकरू  बेरोजगार युवक - युवती व महिलांना व्यवसाय  प्रशिक्षण देणे -
श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील होतकरु बेरोजगार  युवक- युवती व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानने बॅंक ऑफ इंडियाच्या स्टार स्वयंरोजगार योजनेच्या मदतीने व पुढाकाराने   दि. 14 एप्रिल 2015 ते 15 मे 2015 या कालावधीत मुलांसाठी टु - व्हिलर दुरुस्ती व देखभाल  आणि मुलींसाठी ड्रेस डिझायनिंग असे एक महिन्याचे दोन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ 42 प्रशिक्षणार्थीना झाला आहे.

तसेच दिनांक 12 एप्रिल 2016 ते 26 एप्रिल 2016 या कालावधीत मसाला बनविणे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी 38 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.  दिनांक 12 एप्रिल 2016 ते 02 मे 2016 या कालावधीत मोबाईल दुरुस्ती व देखभाल हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी एकूण 78 प्रशिक्षणार्थीनी  लाभ घेतला.


 

bottom of page