डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र
डी. व्ही. सावरगावकर प्रायमरी आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल मार्गताम्हाने, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
शाळेची स्थापना - 14 - डिसेंबर - 2009 यु डायस नं. - 27320104604 शाळा सांकेतांक - 25.01.073
शाळेची मुलभूत माहिती -
शाळेचे व्यवस्थापन :- कायम विनाअनुदानित
मान्यता दिनांक :- 18/08/ 2009
स्थापनेचे वर्ष :- 14/ 12 / 2009
या योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित
शाळेचा प्रवर्ग:- प्राथमिक, उच्चप्राथमिक माध्यमिक
शाळेचा सर्वात खालचा वर्ग :- पहिली,
शाळेचा सर्वात वरचा वर्ग :- दहावी.
उल्लेखनिय कामगिरी
किक बॉक्सिंग मध्ये पदक
कथा- कथन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
संस्थार्गत आंतरशालेय कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक
किक बॉक्सिंग मध्ये पदक
विद्यालयाविषयी
ही शाळा चिपळूण पासून 22 किमी.अंतरावर गुहागर विजापूर महामार्गावर मार्गताम्हाने येथे स्थित आहे.शाळेची स्थापना जून 2010 मध्ये करण्यात आली आणि शाळेला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त आहे.शाळेत नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. शाळेचा पट खालील प्रमाणे आहे .
विद्यालयाची ठळक वैशिष्टे:
-
स्वतःची इमारत
-
प्रशिक्षित शिक्षक
-
ग्रंथालय
-
ई-लर्निंगसाठी ओव्हरहेड प्रोजेक्टर
-
संगणक प्रयोगशाळा.
-
उपक्रम : भरत नाट्यम वर्ग , ज्युडो प्रशिक्षण वर्ग , चित्रकला व हस्तकला वर्ग
-
डिजिटल वर्ग
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खालील स्पर्धांचे आयोजन केले जाते -
-
विज्ञान प्रदर्शन, भोंडला, राखी बनवणे, सॅलड सजावट, श्लोक वाचन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा,कथा कथन - इत्यादी स्पर्धा
-
मुलांना क्रीडा कौशल्य आणि सर्वांगीण विकासासाठी तसेच खो-खो, लंगडी, कबड्डी, धावणे यासाठी प्रशिक्षित करतो.
-
पालकांचा सहभाग देखील या स्पर्धा मध्ये असतो.
-
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध खालील उपक्रम आयोजित केले जातात.
-
पिकनिक, क्षेत्र भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन इत्यादी
-
जयंती, पुण्यतीथी आणि दहीकाला , सरस्वती पूजन इत्यादी विविध उत्सवही शाळेत साजरे करतो.
-
शास्त्रीय नृत्य - भरतनाट्यम जूडो - कराटे आणि रेखाचित्र सारख्या अभ्यासक्रमांसाठी आम्ही वेगवेगळे वर्ग आयोजित करतो. त्यांच्या जीवनात स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व जाणून आम्ही विद्यार्थ्यांना खालील परीक्षांमध्ये प्रविष्ट करतो.
-
शासकीय चित्रकला परीक्षा
-
एम. पी. एस. पी. (महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा)
-
कलविकास मंचाद्वारे रंगभरण स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा मध्ये सहभाग .
-
उपरोक्त स्पर्धात्मक परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.