top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

श्रीसिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर जि. रत्नागिरी
शाळेची स्थापना - 06 -जुन -1996   यु डायस नं. - 27320307002  शाळा सांकेतांक - 25.03.019

शाळेची मुलभूत माहिती -

शाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त

मान्यता दिनांक     :-  06/04/1996

स्थापनेचे वर्ष      :- 06/06/1996

या योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित

शाळेचा प्रवर्ग:- उच्चप्राथमिक आणि                          माध्यमिक                  

शाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,

शाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 10 वी.

उल्लेखनीय कामगीरी

विद्यालयातील उल्लेखनीय बाबी

  • चतुरंगप्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत आठ वेळाप्राप्त .

  • गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन 2017-18 मधील शिक्षक मॉडेलसाठी प्रथम पारितोषिक.

  • गुहागर तालुकास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन 2022-23

  • 17 वर्षाखालील मुली तालुकास्तर विजयी –जील्ह्यासाठी निवड .

  • 17 वर्ष ट्रीपल जंप मुले – विभागासाठी निवड 

  • 17 वर्ष ट्रीपल जंप मुले – तालुका द्वितीय क्रमांक

  • 17 वर्ष मुली 3000 मीटर चालणे  - तालुका प्रथम क्रमांक

  • 17 वर्ष मुली 3000 मीटर चालणे  - तालुका तृतिय  क्रमांक

  • 17 वर्ष मुली उंच उडी  - तालुका द्वितीय क्रमांक

  • 17 वर्ष लांब उडी मुले  - तालुका प्रथम क्रमांक

  • 17 वर्ष मुले 400 मीटर धावणे - तालुका प्रथम क्रमांक

  •  आठवी ते दहावी इलर्निंग सुविधा करण्यात आली आहे.

विद्यालयातील उल्लेखनीय बाबी

  • विज्ञान प्रदर्शन – तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा – तृतीय क्रमांक.

  • अध्य्पाक शिक्षणिक साहित्य निर्मिती गट – प्रथम क्रमांक जिल्ह्यसाठी निवड  

  • माजी विद्यार्थी मेळावा आयोजन- रौप्य वर्षानिमीत्त सर्व विद्यार्थी एकत्र करण्यात आले.

  • शिक्षक प्रोबोधिनी हॉलचे उदघाटन - शिक्षक,विद्यार्थी व समाजातील इतर घटकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठीची  सोय करण्यात आली आहे.

  • व्यवसाय प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन -ग्रामीण भागातील विद्यार्थांना इलेक्ट्रिकाल,प्लंबिंग,वेल्डिंग,स्प्रेपेन्टिंग,सुतारकाम,थ्रीडीपेन्टिंग या सारखे मिनी कोर्सचे अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी वर्कशॉप तयार करण्यात आले आहे.

  • कर्मचारीवृंद = 8 

  • मुख्याध्यापक- 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2

 विद्यालयाविषयी

                माध्यमिक स्तरावर मुंढर पंचक्रोशिमधील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शैक्षणिक सुविधा नव्हती. ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी  शिक्षणांची सोय व्हावी म्हणून मुंढर येथे 1996 मध्ये  हे विद्यालय सुरू करण्यात आले.  प्रथम शाळा प्रतिष्ठान द्वारे एका छोट्याशा भाड्याच्या जागी सुरु करण्यात आली.
                  दोन वर्षांत प्रतिष्ठानने आपली स्वतःची इमारत पूर्ण केली. नोव्हेंबर 1997 मध्ये शाळेला नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. नातू प्रतिष्ठानला श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई यांचे कडून 15 लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळाली. मुंढर   शाळेचे 20 नोव्हेंबर 2000 रोजी 'श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर' असे नामकरण करण्यात आले.
              श्री. शेखर गाडगीळ यानी शिक्षक प्रबोधिनी करिता रूपये 25 लक्षची भव्य आर्थिक मदत प्रतिष्ठानला दिली सदर देणगीतून शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेसाठी प्रशस्त  हॉलसहित शाळेच्या दुस-या मजल्याचे काम करण्यात आले.

            शिक्षक प्रबोधिनी  हॉलमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.तसेच  ग्रामीण भागातील होतकरु बेरोजगार  युवक- युवती व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानने बॅंक ऑफ इंडियाच्या स्टार स्वयंरोजगार योजनेच्या मदतीने व पुढाकाराने मुलांसाठी टु - व्हिलर आणि मोबाईल दुरुस्ती व देखभाल  आणि मुलींसाठी ड्रेस डिझायनिंग व मसाला बनविणे  असे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.येथे विद्यार्थ्यांच्या छंद वर्गाची देखील सुविधा आहे. आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर गेलेले विद्यार्थी सध्या  विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
              विद्यालयामध्ये  थोर भारतीय व्यक्तींच्या जयंती उत्सव साजरा करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या महान कार्याशी परिचित करणे, योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन आणि जागतिक योग दिन साजरा करणे, ओझोन दिन, वन्यजीव सप्ताह , जागतिक रक्तदान दिन आणि जागतिक एड्स दिन साजरा करणे,. आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे. वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा यासाठी मार्गदर्शन,एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन तसेच प्रती वर्षी दि. (25 जुलै) रोजी  विविध कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करून 'तात्यासाहेब नातू स्मृती दिन' साजरा केला जातो. 

            विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे.  रेखांकन आणि चित्रकला  कार्यशाळा आयोजित करणे , विद्यार्थ्यांसाठी  वर्षा सहल व शैक्षणिक सहल आयोजित करणे इत्यादी उपक्रम घेतले जातात. 

              पालक - शिक्षक गट स्थापन करून विद्यार्थ्यांच्या  प्रगती बद्दल मार्गदर्शन केले जाते. सरकारी आणि स्थानिक संस्थांनी आयोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला जातो.

              

    विद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-

  • पुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.

  • भरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.

  • ग्रंथालयात भरपूर पुस्तके.

  • आय.सी.टी. प्रयोगशाळा.

  • मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.

  • व्हरांडा व बोलक्या भिंती.

  • वर्गसजावट  व आकर्षक मांडणी.

  • पुरेसे फर्निचर.

  • एल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.

  • प्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.

  • पुरेसे शैक्षणिक साहित्य.

  • मध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.

  • अध्ययन पोषक वातावरण.

  • गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत. 

bottom of page