top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.
  शाळेची स्थापना - 01 -जुन -1999   यु डायस नं. - 27320301002   शाळा सांकेतांक - 25.03.022

शाळेची मुलभूत माहिती -

शाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त

मान्यता दिनांक     :- 01/06/1999

स्थापनेचे वर्ष      :- 01/06/1999

या योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :-नियमित

शाळेचा प्रवर्ग:- उच्चप्राथमिक, माध्यमिक                    आणि उच्चमाध्यमिक

शाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,

शाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 12 वी.

उल्लेखनिय कामगिरी

विद्यालयातील उल्लेखनीय बाबी -

  • चतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार अनेक  वेळा प्राप्त.

  • साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान विद्यालयाची यशस्वी कामगिरी.

  • क्रीडास्पर्धेतील यशस्वी कामगिरी - विभागीय स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल.

  • इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थिनीची राज्य स्तरीय निवड.

  • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षामध्ये (NMMS)  विद्यार्थ्यांची निवड.

  • आखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा जिल्हास्तरासाठी निवड.

  • वक्तृत्व स्पर्धेमध्ये रौप्यपदक.

  • दहावी व बारावी  उत्कृष्ट निकाल.

  • कर्मचारी वृंद = 8

  • मुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2

                  कनिष्ठ महाविद्यालयाविषयी -      

  • भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल स्थापना - 2009 

  •  आयटी ऑलम्पियाड -                                             

  •      १. कुमारी प्रतिक्षा अनंत खेतले  - प्रथम क्रमांक                                            २. कुमारी समिक्षा महेश पेवेकर - द्वितीय क्रमांक                                          ३. कुमारी तेजल सुरेश खडपे  -  तृतीय क्रमांक  

  •  तालुकास्तरीय व जिल्हास्तीय कुस्ती स्पर्धेमध्ये कुमार नरवणकर प्रेमनाथ दत्ताराम  याने प्रथम क्रमांक मिळवला त्याची विभागिय स्पर्धेत निवड 

  • कर्मचारी वृंद = 4 , प्राध्यापक – 4 

 

विद्यालय  ठळक वैशिष्ठ्ये -

 

झांज व लेझीम पथक - 

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात झांज व लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.परिसरातील  व शाळेतील विविध सण उत्सव आणि सार्वजनिक उपकमांमध्ये  वर्षभर सहभाग घेतला जातो .

एस.टी.पास योजना –

दूर दूर वरून प्रवास करून विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठी एस.टी.पास काढून दिले जातात .त्यामुळे परिसरातील वड्या वस्त्यातून शाळेत येणाऱ्यामुलांची संख्या वाढलेली आहे .गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो.

शैक्षणिक साहित्य वाटप – 

दानशूर व्यक्ती व संस्थाशी संपर्क साधून विद्यालयातील होतकरू हुशार मुलांसाठी विविध शैक्षणिक साहित्य मिळवून त्याचे दरवर्षी विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.त्यामुळे शालेय गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

कला दालन – 

दर वर्षी विविध शैक्षणिक उपक्रमातर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कला कुसरीच्या वस्तू बनविणे,कलांविषयी स्पर्धा व परीक्षा , बातम्या –चित्रे संग्रह , डान्स व नाट्य कला इत्यादी कलेचा  समावेश असतो.

शैक्षणिक सहलीचे आयोजन – 

विद्यालया मार्फत गेले अनेक वर्ष शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते त्यामध्ये वर्षा सहल , वन भोजन , क्षेत्र भेट आणि एक मोठी सहल आदी उपक्रम विद्यालयात राबवून त्याद्वारे इतर ज्ञान व अनुभव आवर्जून मुलांना दिले जातात.

१. तालुकास्तरिय मुख्याध्यापक संघ रत्नागिरी (उच्च माध्यमिक गट)
सांस्कृतिक कार्यक्रम - नाट्य स्पर्धा – द्वितीय क्रमांक

२. तालुकास्तरिय मुख्याध्यापक संघ रत्नागिरी (उच्च माध्यमिक गट)
हस्ताक्षर  स्पर्धा – प्रथम क्रमांक  कु.समिक्षा राकेश पवार 

३. तालुकास्तरिय मुख्याध्यापक संघ रत्नागिरी (उच्च माध्यमिक गट)
निबंध   स्पर्धा – प्रथम क्रमांक  कु.रिया अनिल
वाघे

४. संस्थांतर्गत स्पर्धा   (माध्यमिक गट)
  घोषवाक्य स्पर्धा – द्वितीय क्रमांक  कुमार .मंथन दिलीप दाभोलकर 

५. संस्थांतर्गत स्पर्धा   (माध्यमिक गट)
निबंध  स्पर्धा – तृतीय  क्रमांक  कु. गौरी शैलेश पड्याळ 
६. रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युडो संघटना आयोजित जिल्हास्तरिय ज्युडो स्पर्धा  ( माध्यमिक गट)
रिक्ता रमेश भुवड        गोल्ड मेडल 
तनुश्री मंगेश काजारे     गोल्ड मेडल
प्राची रविंद्र भुवड        सिल्व्हर मेडल 
ओम पुंडलिक नाटेकर    ब्राँज मेडल

शाळा आपल्या दारी योजना -

शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाउन विद्यार्थी-विद्यार्थीनी  व पालक यांच्याशी संपर्क साधतात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक अडीअडचणींचे   योग्य आकलन झाल्यामुळे

 योग्य तो मार्ग काढण्यास मदत होऊ शकते.

ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा -
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते आणि विद्यालयातील ग्रंथालयाचा अधिक वापर होतो.

व्यवसाय मार्गदर्शन - 

विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कोपरा व व्य. मा. कक्ष आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांना मानशास्त्रीय कसोटी द्वारा समुपदेशन केले जाते.  

एक मुल, एक झाड -

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत: लाऊन त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जाते. 

चिमणी पाखरं खाऊ प्रकल्प -

पक्षांसाठी मुख्यत: उन्हाळ्यामध्ये दाणा - पाण्याची सोय करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.  

शालेय निवडणूक -
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही सविंधान व शासन प्रणालीची जाणीव निर्माण करणे.

सूर्यनमस्कार -  

दर शनिवारी विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार घेतले जातात. रथसप्तमी, जागतिक  सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो.

व्याख्यानमाला -  

25 जुलै डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.

विद्यालयाविषयी -

सन - 1992 साली अंजनवेल ग्रामस्थांनी गोपाळगड माध्यमिक विद्यालय,अंजनवेलची स्थापना केली. पाच वर्षानंतर  आर्थिक अडचणीमुळे शाळा चालविणे कठीण होऊन बसल्याने ग्रामस्थांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, मार्गताम्हाने. ता. चिपळूण.यांचे कडे शैक्षणिक वर्ष सन - 1997 - 1998 साली हस्तांतरित केली.

अंजनवेल, ता.गुहागर पासून श्रीदेव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर व खाडीच्या पलीकडील बाजूस लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळ, ता.दापोली ही माध्यमिक विद्यालये किमान 15 किलोमीटर अंतराने दूर असल्याने गावामध्ये शिक्षणाचा प्रचार, प्रसार झाला नव्हता त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचेही प्रमाण खूपच कमी होते.

डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानने नाजूक अवस्थेत असलेल्या शाळेला सर्वार्थाने मदत करून उभारी दिली आणि शैक्षणिक वर्ष सन  1999 - 2000 मध्ये अधिकृत शासन मान्यता मिळविली. शाळेतील शिक्षकांनी  ज्ञानदान करून सतत इयत्ता - 10 वीचे निकाल उंचावले व गुणवत्ता कायम राखली. त्याची फलनिष्पत्ती म्हणून शाळेला सन - 2007 साली शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले.नंतरच्या काळात अंजनवेलमधील प्रतिष्ठीत ग्रामस्थ डॉ. पांडुरंग हरी वैद्य यानी 5 लाख रूपयांची भरीव देणगी दिल्यांमुळे  प्रतिष्ठानने गोपाळगड माध्यमिक विद्यालय, अंजनवेल चे दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल असे नामकरण केले.

माध्यमिक शिक्षणाची गरज पूर्ण झाल्यानंतर डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानने  परिसरातील ग्रामस्थांची मागणी व विद्यार्थ्यांची गरज ओळखून ज्युनिअर कॉलेज आर्टस् , कॉमर्स  ( संयुक्त )सुरू करण्याचे ठरविले. ज्युनिअर कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी श्रीमती सरोजताई परमार यांनी 5 लाख रूपयांची देणगी दिल्यामुळे कॉलेजचे नामकरण    भागीर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल. करण्यात आले.  

 सहशालेय उपक्रम - 

शालेय परीक्षेबरोबरच NMMS , NTS, MTS, KTS, विज्ञान रंजन, शासकीय रेखाकला, गणित संबोध , इतिहास मंडळ परीक्षा , राष्ट्र भाषा हिंदी परीक्षा , क्रांतिवीर परिचय परीक्षा अशा शाळाबाह्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ केले जाते. या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुयशही मिळाले आहे. शाळेमध्ये राष्ट्रीय सण नेत्यांच्या जयंत्या , पुण्यतिथी व महत्त्वाचे इतर दिन साजरे केले जातात. दिनांक 25 जुलै डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा केला जातो.त्या अनुशंगाने विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले काढणे , विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे , हस्ताक्षर, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.  विद्यालयात इतर विविध स्पर्धाही घेतल्या जातात. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ व नातू प्रतिष्ठान मार्फत कथाकथन,निबंध, सामान्यज्ञान क्रिडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शन , M.C.C. कवायत स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात.या मध्येही विद्यार्थ्यांचा नेहमीच सहभाग असतो. अपंग निधी,अंधनिधी संकलन या उपक्रमात विद्यार्थी नेहमीच सहभागी असतात. आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची फक्त संख्या न राखता गुणवत्ताही राखली जाते. विद्यालयाचा S.S.C. चा निकाल दर वर्षी चांगला लागतो.त्यासाठी ज्यादा तासांचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहल, शैक्षणिक सहल व स्नेहसंमेलन यांचे आयोजन करण्यात येते.

ज्युनिअर कॉलेज व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी  युवा महोत्सव,खाद्यमहोत्सव, विदयुत सुरक्षा सप्ताह,ग्रामपंचायत / शासन स्तरावरील आरोग्य तपासणी, शस्र प्रदर्शन आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती (पोलीस ठाणे गुहागर यांच्या सहयोगाने), कराटे प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण यांचे आयोजन करण्यात येते.

सदर कॉलेजचा निकाल ( सन - 2009 पासून ) कॉलेज स्थापनेपासून 100% आहे. कॉलेज स्थापनेपासून - 29 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेले ह्या ज्युनिअर कॉलेजमध्ये आज 176 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-

  • पुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.

  • भरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.

  • ग्रंथालयात भरपूर पुस्तके.

  • आय.सी.टी. प्रयोगशाळा.

  • मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.

  • व्हरांडा व बोलक्या भिंती.

  • वर्गसजावट  व आकर्षक मांडणी.

  • पुरेसे फर्निचर.

  • एल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.

  • प्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.

  • पुरेसे शैक्षणिक साहित्य.

  • मध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.

  • अध्ययन पोषक वातावरण.

  •  गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत. 

  • व्यवसाय मार्गदर्शन कक्ष

  • व्यवसाय मार्गदर्शन कोपरा.

  • दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे समुपदेशन.

  • इ - लर्निंग.

bottom of page