

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र




विद्यालयातील उल्लेखनीय बाबी -
-
चतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आता पर्यंत चार वेळा प्राप्त .
-
सानेगुरुजी गुणवत्ताविकास अभियान विद्यालयाची जिल्हा स्थरापर्यंत यशस्वी कामगिरी.
-
क्रीडा स्पर्धेतील यशस्वी कामगिरी - विभागीय व राज्य स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल .
-
मार्च 2017 पर्यंत S.S.C.च्या 20 बॅचेसपूर्ण.
-
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 966
-
उत्तीर्ण विद्यार्थी- 919
-
सलग सात वर्षे 100 % निकाल.
-
मार्च 2017 पर्यंत H.S.C .च्या 5 बॅचेसपूर्ण .
-
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 219
-
उत्तीर्ण विद्यार्थी - 218
-
सलग चार वर्षे 100 % निकाल
-
कर्मचारी वृंद = 12
-
मुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 8 , लिपिक - 1 , शिपाई - 2
उल्लेखनिय कामगिरी

गोडबोले पुरस्कार 2017-2018

गोडबोले पुरस्कार 2016-2017

विभागियस्तरावर कब्बडीमध्ये निवड

गोडबोले पुरस्कार 2017-2018
विद्यालयाविषयी -
विद्यालयाची स्थापना -
चिपळूण - गुहागर मार्गावरील उमरोली या गावापासून ०६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या बोरगाव या खेडेगावामध्ये हे विद्यालय चालविले जाते. डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानद्वारे सुरु करण्यात आलेले हे पहिले विद्यालय असून जून १९९५ पासून हे विद्यालय चालविले जात आहे. . इ .८ वी पासून इ .१२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आता या ठिकाणी उपलब्ध आहे. हे दोनही उपक्रम शासनमान्य असून माध्यमिक विद्यालय अनुदानित आहे.
कनिष्ठ महाविद्यालय -
या विद्यालयाला जोडूनच कला व वाणिज्य (संयुक्त) शाखांचे कनिष्ठ महाविद्यालयही जुलै २०११ पासून सुरु करण्यात आले आहे.कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित तत्वावर सुरु आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयाला वसंतराव व शांताताई पटवर्धन न्यासाकडून 8 लक्ष रूपयांची भरीव देणगी देण्यात आली.सदर कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरन सन 2016 मध्ये वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव असे करण्यात आले.
विद्यालयाची पार्श्वभूमी –
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे या हेतूने हे विद्यालय सुरु करण्यात आले आहे. हे विद्यालय सुरु झाल्यापासून मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बोरगाव गावासाहित पंचक्रोशीतील अनेक गावांना या विद्यालाचा लाभ होत आहे. माध्यमिक शिक्षणाबरोबरच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा खेडेगावामध्ये उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी निदान इ .१२ वी पर्यंत शिक्षण घेत आहे. विद्यालयातील सन २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षासाठीची इ .०८ वी ते इ .१० वी पर्यंतची विद्यार्थी संख्या १४७ असून इ .११ वी व इ .१२ वीची विद्यार्थी संख्या ८९ इतकी असून इ .०८ वी पासून इ .१२ वी पर्यंत एकूण २३६ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विद्यालयाचे निकाल -
विद्यालयाने चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा इ .१० वी चा मार्च २०११ पासूनचा निकाल १०० टक्के इतका आहे. इ .१२ वी चा मार्च २०१७ पर्यंतचा निकाल १०० टक्के आहे. विद्यालयातून इ .१० वी च्या २० बॅच बाहेर पडल्या असून एकूण ९६६ विद्यार्थी इ .१० वी पर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. तर इ .१२ वी च्या एकूण ०५ बॅच बाहेर पडल्या असून एकूण २१९ विद्यार्थी इ .१२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.
विद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा -
विद्यालायाकरिता संस्थेने ०९ खोल्यांची सुसज्ज इमारत बांधली आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असून प्रशस्त क्रीडांगणही उपलब्ध आहे. वसंतराव पटवर्धन (ठाणे) स्मृती ग्रंथालय या नावाचे वाचनालय उपलब्ध असून विद्यार्थी वाचनालयातील पुस्तक संख्या १३४८ इतकी असून शिक्षक ग्रंथालायाकरीताची पुस्तक संख्या ५७७ इतकी आहे.
विद्यालयातील शालेय आणि सहशालेय उपक्रम -
विद्यालयाचा निकाल सातत्याने उत्कृष्ट लागावा याकरिता जादा तासांचे नियोजन करण्यात येते. पालकसभांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची प्रगती त्यांना सांगण्यात येते. सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन, चतुरंग प्रतिष्ठानद्वारे आयोजिल्या जाणाऱ्या निवासी वर्गासाठी तसेच शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असतो. विविध क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहल यांसह अनेक शालेय, सहशालेय आणि अभ्यापुरक उपक्रम चालविण्यात येतात.