top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

डॉ .सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय, देवखेरकी,
ता.चिपळूण, जिल्हा-रत्नागिरी
शाळेची स्थापना - 06 -जुन -1996   यु डायस नं. - 27320106403  शाळा सांकेतांक - 25.01.056 

शाळेची मुलभूत माहिती -

शाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त

मान्यता दिनांक     :-  06/04/1996

स्थापनेचे वर्ष      :- 06/06/1996

या योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित

शाळेचा प्रवर्ग :- उच्चप्राथमिक आणि           

                       माध्यमिक                            

शाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,

शाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 10 वी.

उल्लेखनिय कामगिरी

विद्यालयातील उल्लेखनीय बाबी

  • चतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत चार वेळा प्राप्त.

  • महाराष्ट्र शासनाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आतापर्यंत चार वेळा.

  • महाराष्ट्र शासन – सामाजिक वनीकरण विभागाचा 2011-2012 चा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार प्राप्त .

  • साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान विद्यालयाची यशस्वी कामगिरी.

  • क्रीडास्पर्धेतील यशस्वी कामगिरी –विभागीय स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल.

  • मार्च 2018 पर्यंत S.S.C.च्या  20 बॅचेस पूर्ण .

  • एकूण प्रविष्ठ विद्यार्थी -537

  • उत्तीर्ण विद्यार्थी - 476

  • सलग पाच वर्षे 100 % निकाल.

  • कर्मचारी वृंद = 8

  • मुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2

 

                        विद्यालयाविषयी 


विद्यालयाची पार्श्वभूमी  :-  

6 जून 1996 रोजी एका भाड्याच्या घरात इ.आठवी चा वर्ग सुरु झाला. 24 विद्यार्थी व 2 शिक्षक पहिल्यावर्षी कार्यरत. नैसर्गिक वाढीने इ.9 वी  चा वर्ग  दुसऱ्या वर्षी,  व तिसऱ्या वर्षी इ. 10 वी चा वर्ग सुरु झाला. 1999 ला इ. 10 वी ची पहिली बॅच 70.58% निकालाने बाहेर पडली. पहिली चार वर्षे भाड्याच्या इमारतीत विद्यालयाचे कामकाज चालले. त्यानंतर संस्थेने शाळेसाठी एक एकर जागा घेतली व पाच खोल्यांमधील तीन खोल्यांमध्ये शाळा व दोन खोल्यांमध्ये वसतिगृह चालविले. कालांतराने वसतिगृह इमारतीचे स्वंतत्र बांधकाम केले व पाचही खोल्यांची इमारत शाळेसाठी वापरण्यास सुरुवात झाली.

सध्या तीन वर्गखोल्या एक प्रयोगशाळा, आय.सी.टी. संगणक प्रयोगशाळा व कार्यालयासाठी दोन खोल्या अशा खोल्यांमधून शाळेचे कामकाज चालते.

3 जानेवारी 2010 पासून माध्यमिक विदयालय देवखेरकीचे नामकरण डॉ.सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी असे करण्यात आले.डॉ. निळकंठ ढेरे यांच्याकडून प्रतिष्ठानला 8 लक्ष रूपयांची भरगोस देनगी मिळाली.

शालान्त परीक्षेचा उत्कृष्ठ निकाल, वैयक्तिक मार्गदर्शन व लक्ष , सानेगुरुजी गुणवत्ता विकास अभियानात  विद्यालयाची उत्तम कामगिरी, क्रीडा स्पर्धेमधील उल्लेखनीय यश, स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग व मार्गदर्शन , गरीब , गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप व मदत, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन,वेगवेगळ्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळवून द्याव्या म्हणून नियोजन अशा पद्धतीने कामकाज सुरु आहे.  

विद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-

  • पुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.

  • भरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.

  • ग्रंथालयात भरपूर पुस्तके.

  • आय.सी.टी. प्रयोगशाळा.

  • मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.

  • व्हरांडा व बोलक्या भिंती.

  • वर्गसजावट  व आकर्षक मांडणी.

  • पुरेसे फर्निचर.

  • एल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.

  • प्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.

  • पुरेसे शैक्षणिक साहित्य.

  • मध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.

  • अध्ययन पोषक वातावरण.

  •  गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत. 

bottom of page