

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र




NOTABLE PERFORMANCE

तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ

तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ
वसतिगृहाची वैशिष्टये
-
वसतिगृहात कोणतेही शुल्क नाही.प्रवेश पूर्णपणे मोफत.
-
राहण्याची व जेवणाची मोफत सोय.
-
आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा.
-
वसतिगृहाची स्वतंत्र इमारत.
-
वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता मोफत वैद्यकीय उपचार व आरोग्य तपासणी.
-
गरीब,गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
-
चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत दोन वेळा प्राप्त.
-
एकूण विद्यार्थी प्रविष्ठ-३९३
-
कर्मचारी वृंद - 3
-
अधिक्षक - १, स्वयंपाकी - १, चौकीदार - १
कै.प्रेमजीभाई आसर छात्रालय देवखेरकी वसतीगृहाविषयी
चिपळूण तालुक्यामध्ये पूर्वी रामपूर आणि मार्गताम्हाने येथेच माध्यमिक विद्यालये सुरु होती. सन 1965 मध्ये मार्गताम्हाने येथे हे वसतिगृह सुरु करण्यात आले. त्यावेळी वसतिगृहासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान उपलब्ध नव्हते. केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी व शाळेकरिता विद्यार्थी मिळावेत म्हणून कै.डॉ.तात्यासाहेब नातू यांनी स्वतःच्या खर्चाने वसतिगृह सुरु ठेवले होते. अशा प्रकारे सन 1965 ते 1972 पर्यंत वसतिगृह चालू होते. नंतर हे वसतिगृह बंद पडले.
कै.वसंतराव भागवत यांच्या आग्रहाने सन 7 जून 1985 पासून प्रेमजीभाई आसर छात्रालय या नावाने पुन्हा वसतिगृह सुरु केले गेले. त्यानंतर मागवर्गीय विद्यार्थी वसतिगृह या शासकीय योजनेंतर्गत 30 विद्यार्थ्यांची वसतिगृहास मान्यता मिळाली. नंतर सन 1998 पासून हे वसतिगृह मौजे देवखेरकी, ता.चिपळूण येथे स्थलांतरीत करण्यात आले. तेथे एका भाड्याच्या इमारतीमध्ये सन 1998 ते 2001 असे वसतिगृह चालविण्यात आले. 2001 मध्ये संस्थेने शाळेसाठी इमारत बांधली त्या इमारतीमधील दोन खोल्यांमध्ये हे वसतिगृह चालविले जात होते. मा.खासदार श्री.वेदप्रकाशजी गोयल यांच्या खासदार निधीतून वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. आता या इमारतीमध्ये वसतिगृह सुरु आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले व मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहात राहून आपले शिक्षण घेत आहेत.
वसतिगृहाची मान्य संख्या 30 असून प्रतिवर्षी 40 ते 45 गरीब,गरजू मागासवर्गीय विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेत आहेत. प्रवेशित कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क किंवा कोणत्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही. या वसतिगृहात आतापर्यंत 435 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. वसतिगृहाचा इयत्ता 10 वीचा निकाल सलग 5 वर्षे 100 टक्के लागलेला आहे. व सरासरी 90 टक्केच्या पुढेच असतो. चतुरंग प्रतिष्ठान मुंबई या संस्थेमार्फत दिला जाणारा एस.वाय.गोडबोले पुरस्कार आतापर्यंत 2 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रातीलही कामगिरी उत्तम आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. इतर वसतीगृहांपेक्षा या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जेवण खाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे असते असे म्हटले जाते. या वसतिगृहाला शासनाकडून 30 विद्यार्थ्यांचे अनुदान मिळते परंतु प्रतिवर्षी 40 ते 45 विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ करीत असतो. जर जादा विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ केले नाही तर हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. या जादा प्रवेशित केलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च ही संस्था व हितचिंतक करीत असतात. शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने व्यायामशाळा लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वसतीगृहामधील विविध सुविधा
आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा

बायोगॅस प्रकल्प
