top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

शाळेची मुलभूत माहिती -

शाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त

मान्यता दिनांक     :-  22/07/1997

स्थापनेचे वर्ष      :-  22/07/1997

या योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित

शाळेचा प्रवर्ग :- उच्चप्राथमिक आणि        

                माध्यमिक            

शाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,

शाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 10 वी.

ग. ज.तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर, ता. गुहागर जि. रत्नागिरी
शाळेची स्थापना - 22-जुलै -1997   यु डायस नं. - 27320311404  शाळा सांकेतांक - 25.03.020
उल्लेखनिय कामगिरी

विद्यालयातील उल्लेखनिय बाबी

  • शै.वर्ष 2010-11 व 2011-12 मध्ये विद्यालयास तालुकास्तरीय ‘साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान’ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

  • चतुरंग प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारने विद्यालयातील अनेक विद्यार्थी सन्मानित झाले आहेत.

  • महाराष्ट्रशासना तर्फे देण्यात येणारा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आत्ता पर्यंत 2 विद्यार्थ्यांना प्राप्त.

  • संस्थेमार्फत हुशार व होतकरू विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्व प्रकारची आर्थिक मदतहि केलेली आहे. दिनेश डिंगणकर , उमेश सुर्वे .संदिप भरणकर , अमोल शितप, महेश घाणेकर , दिलीप माटल , मनेश डिंगणकर यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ संस्थेमुळेच होऊ शकले आहे.ग्रामस्थ संस्था चालक संस्थेचे हितचिंतक संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या  प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. शाळा चालवणे हेच संस्थेचे धेय नाही तर शाळेतील विद्यार्थाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आणि श्वास आहे. यासाठी प्रतिष्ठान व सर्व कर्मचारीवर्ग सतत प्रयत्नशील आहेत.  

  •  दहावी   उत्कृष्ट निकाल.

  • कर्मचारी वृंद - 08

  • मुख्याध्यापक - 1 , शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2

विद्यालयाविषयी

  

                     पाचेरी आगर पंचक्रोशीतील आवरे,असोरे,कुडली (माटलवाडी),शिवणे,सडेजांभारी या गावातील विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाची सुविधा व्हावी यासाठी डॉ.तात्या साहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाने या संस्थेमार्फत कै.पद्माकरअप्पा निमकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे प्रयत्नातून हे विद्यालय 4 जुलै 1997 मध्ये सुरु झाले. सुरवातीच्या काळात श्री. काशिनाथ घाणेकर (आवरे) यांचे घरात केवळ 17 विद्यार्थी घेऊन 04 जुलै 1997 मध्ये या शाळेची सुरुवात झाली.

                  सन- 2000 मध्ये संस्थेच्या मालकीची इमारत बांधून पूर्ण झाली. सन- 2009 मध्ये पहिल्या मजल्याचे बांधकाम करून संस्थेच्या मालकीची एक मजली परिपूर्ण भव्य इमारत बांधून पूर्ण झाली.सन 2010 मध्ये कै.गजानन जनार्दन तथा तात्यासाहेब वझे न्यासाकडून 5 लक्ष रूपयांची भरीव देणगी नातू  प्रतिष्ठानला प्राप्त झाल्यामूळे विद्यालयाचे नाव ग. ज. तथा तात्या वझे माध्यमिक विद्यामंदिर पाचेरी आगर, असे ठेवण्यात आले.

                        विद्यालयातून आता पर्यंत 1000 विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. आज ते निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या चालू शैक्षणिक वर्षात विद्यालयात इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये 100 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयातील कर्मचारी व संस्था चालक सतत प्रयत्नशील आहेत.

                    शालेय परीक्षेबरोबरच NMMS , NTS, MTS, KTS, विज्ञान रंजन, शासकीय रेखाकला, गणित संबोध , इतिहास मंडळ परीक्षा , राष्ट्र भाषा हिंदी परीक्षा , क्रांतिवीर परिचय परीक्षा अशा शाळाबाह्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ केले जाते. या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुयशही मिळाले आहे.

                      शाळेमध्ये राष्ट्रीय सण नेत्यांच्या जयंत्या , पुण्यतिथी व महत्त्वाचे इतर दिन साजरे केले जातात. दिनांक 25 जुलै डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा केला जातो.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले काढणे , विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे , हस्ताक्षर, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. 17 जानेवारी रोजी ग.ज.तथा तात्या वझे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने विद्यालयात क्रिडास्पर्धा , हस्ताक्षर, चित्रकला , निबंधस्पर्धा , वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात , व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व इतर वस्तू स्वरुपात बक्षिसेही दिली जातात. विद्यालयात इतर विविध स्पर्धाही घेतल्या जातात. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ व नातू प्रतिष्ठान मार्फत कथाकथन,निबंध, सामान्यज्ञान , क्रिडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शन , M.C.C. कवायत स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात.या मध्येही विद्यार्थ्यांचा नेहमीच सहभाग असतो. अपंग निधी,अंधनिधी संकलन या उपक्रमात विद्यार्थी नेहमीच सहभागी असतात.

                        आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची फक्त संख्या न राखता गुणवत्ताही राखली जाते. विद्यालयाचा S.S.C. चा निकाल दर वर्षी चांगला लागतो.त्यासाठी ज्यादा तास , विद्यार्थ्यांचा चतुरंग निर्धार निवासी वर्ग, आवरे चंडिका देवालय अभ्यास वर्ग इ. समावेश असतो.                         

bottom of page